ads

Breaking News

अशोक चव्हाणांचा नांदेडात विराट मोर्चा; संभाजीराजेंनी विचारला खरमरीत प्रश्न

मुंबई: नांदेड येथे महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरुद्ध राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठी गर्दी झाली होती. त्यावरच बोट ठेवत खासदार यांनी खरमरीत सवाल केला आहे. ( ) पेट्रोल, डिझेल दरवाढ, सिलिंडरच्या वाढलेल्या किमती, वाढती महागाई यासह विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ सध्या पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या प्रश्नांवर एकीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मुंबईत सायकल रॅलीद्वारे राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिले असताना दुसरीकडे नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोविड नियमांचा यावेळी फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. गर्दीत अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते. त्यावरच बोट ठेवत संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा: संभाजीराजे यांनी याबाबत एक खरमरीत ट्वीट केले आहे. 'एकीकडे करोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन... त्यात ते म्हणतायत विराट मोर्चा झाला, जोरदार आंदोलन पार पडले अणि त्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे आभारही त्यांनी मानले. आता हे बरोबर आहे का?', असा सवालच संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांना केला. दरम्यान, प्रश्नी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू आहे. राज्यव्यापी आंदोलनाची हाक देत त्याची सुरुवातही संभाजीराजे यांनी कोल्हापुरातून केली होती. मात्र, कोविड स्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संभाजीराजे यांनी हे आंदोलन काही काळासाठी स्थगित केले. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतही संभाजीराजे यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाणही उपस्थित होते. त्यापार्श्वभूमीवरच संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांच्या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BaUm4P

No comments