ads

Breaking News

भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबईः मेट्रोच्या () कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळीच कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळं स्थानिक नागरिकांमध्ये संतापाच वातावरण असून नागरिकांना कारवाईला विरोध केला आहे. भाजप आमदार () यांनीही या कारवाईला विरोध केल्यानं त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'कुरार परिसरातील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिस देऊन आज सकाळी ९च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यावर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराबाहेर काढलं. आम्ही याला विरोध केला. त्यामुळं आम्हाला ताब्यात घेतलं,' असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. 'ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे एमएमआरडीएनं तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करुन आरे पोलिस ठाण्यात नेत आहे,' असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. 'मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले. त्या प्रकल्पातील एक स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?,' असा सवाल यावेळी भातखळकर यांनी केला आहे. 'कुरारची कारवाई ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी आहे. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू,' असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36EAkli

No comments