घरात पोटच्या पोरीला एकटं पाहून नराधम बापाचा ताबा सुटला, पण मुलीने जे केलं ते वाचून तुम्हीही शब्बास म्हणाल!
चंद्रपूर : वडील व मुलीच्या नात्याला कलंक लावल्याचा संतापजनक प्रकार चंद्रपूर शहरात समोर आला आहे. वयात आलेल्या मुलीवर घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, मुलीने आपले चारित्र्य सांभाळून घरून पळ काढला आणि पुढचा अनर्थ टळला. त्यानंतर मुलीने वडिलांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील एका कुटुंबात मुलगा, मुलगी असे दोन अपत्ये आहेत. दहावीनंतर मुलगी आईसोबत घरकाम करण्यासाठी जायची. मात्र, वडील कोणतेच काम करीत नव्हते. पण रिकामटेकडा बापाची वाईट नजर आपल्याच मुलीवर होती. मागील वर्षीच्या लाकडाउन काळात एक दिवस घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने स्वतःला सांभाळत बापाला धक्का देत घराबाहेर पळ काढला. या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर वडिलाला घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी आईला फोन करून अपघात झाल्याने घरी नेण्याची विनंती केली. इतकंच नाहीतर यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे सांगून वडिलाने माफी मागितली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा वडिलांकडून त्रास देणे सुरू केले. अखेर या प्रकाराला कंटाळून शुक्रवारी मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वडिलावर गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मुली घरातही सुरक्षित नाही असं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3koOHlT
No comments