ads

Breaking News

राज्यात अजूनही करोनाच्या दुसऱ्या लाटेचं टेन्शन; हे आकडे चिंता वाढवणारे

मुंबई: राज्यातील संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी दैनंदिन रुग्णसंख्या अजूनही मोठी आहे. सध्या राज्यात ८ हजार ते ९ हजारच्या आसपास दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. ताजी आकडेवारी पाहता गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार १७२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ८ हजार ९५० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. करोनाने आज १२४ रुग्ण दगावले असून आतापर्यंत या साथीच्या विळख्यात सापडलेल्या १ लाख २६ हजार ८५१ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. ( ) वाचा: राज्यात करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येत आहे. त्यात दुसरी लाट अजून ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेचीही शक्यता बळावत चालल्याने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रुग्णवाढीला ब्रेक लावण्यासाठी टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा काम करत आहेत. मात्र दैनंदिन रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याने चिंता कायम आहे. काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्याने कडक करण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत. वाचा: करोनाची आजची स्थिती: - राज्यात आज १२४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा. - आज राज्यात ८,१७२ नवीन रुग्णांचे निदान तर ८,९५० रुग्ण बरे होऊन परतले घरी. - आतापर्यंत एकूण ५९,७४,५९४ करोना बाधित रुग्णांनी करोनावर केली मात. - राज्यातील सध्या (Recovery Rate) ९६.२८ % एवढे. - आजपर्यंत तपासलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. - सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये. - राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या लाखापर्यंत आली खाली. सध्या १ लाख ४२९ अॅक्टिव्ह रुग्ण. - जिल्ह्यात १६ हजार ३३९, ठाणे जिल्ह्यात १५ हजार ७९३ तर महापालिका क्षेत्रात १० हजार ६७२ अॅक्टिव्ह रुग्ण. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ioDkYo

No comments