ads

Breaking News

'या' तालुक्यातील तब्बल ७१ गावांत करोनाची दहशत; घातली 'ही' बंधने

नगर: नगर जिल्ह्यात करोनाच्या दृष्टीने तालुका हॉटस्पॉट ठरत आहेत. तालुक्यात एकूण १३१ गावे असून २२ गावांत कडक केल्यानंतर आता ७१ गावे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या गावांत विविध बंधने लागू करण्यात आली आहेत. तहसीलदार ज्योती देवरे यांनी हा आदेश दिला. दरम्यान, या तालुक्यातील संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने येथील काही नमुने डेल्टा व्हेरियंटसंबंधीची तपासणी करण्यासाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. ( ) वाचा: जून महिन्याच्या अखेरपासूनच पारनेर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात २२ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला. असे असूनही तालुक्यात अनेक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम होत आहेत. लग्न समारंभ होत आहेतच शिवाय काल शिरापूर गावात चक्क बैलगाडा शर्यतही झाली. यासाठी सुमारे दोन हजार ग्रामस्थ एकत्र आल्याचे आढळून आले आहे. आता प्रशासनाने आणखी उपाययोजन कडक करण्यास सुरुवात केली आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आजही तालुक्यात १११ नवे रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे आता ७१ गावे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पारनेर शहरासह, सुपा, टाकळी ढोकेश्वर, निघोज, जामगाव, नारायण गव्हाण अशा प्रमुख भागांचा समावेश आहे. वाचा: अशी आहेत बंधने या गावांतील सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही. गावात आलेल्या पाहुण्यांना दहा दिवस गावातील प्राथमिक शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तपासणीत आढळून आलेल्या लक्षणविरहित रुग्णांनाही शाळेत अगर जवळच्या सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रविवारी या गावांत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. रविवार आणि सोमवार या दिवशी प्रत्येक गावात किमान ४०० अँटीजेन तर १५० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहेत. दोन दिवस या गावांना तालुकास्तरीय समित्या अचानक भेट देऊन पाहणी करणार आहेत. याचा अहवाल थेट जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचा आहे. रविवारी लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. या दिवशी परवानगी घेतलेल्या लग्नांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याशिवाय होणारे समारंभ बेकायदा मानले जातील. परवानगी घेतलेल्या लग्नांतही ५० पेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी प्रत्येक लग्नाच्या ठिकाणी छायाचित्रण करण्यासाठी सरकारतर्फे कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. लग्नाच्या ठिकाणीही चाचणी शिबीर लावण्यात येणार आहे. तेथे वधू-वरांसह वऱ्हाडींचीही तपासणी होणार आहे. पुरोहित आणि स्वयंपाकी यांनाही चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. जे तपासणी करण्यास विरोध करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पन्नासची क्षमता संपल्यानंतर लग्नाच्या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी पोलीस, सुट्टीवर आलेले सैनिक, स्थानिक स्वयंसेवक यांची मदत घेण्यात येणार आहे. वाचा: ही आहेत संवेदनशील गावे कळस, सारोळा आडवाई, गाडिलगाव, जातेगाव, वडगाव सावताळ, वासुंदे, देवीभोयरे, मांडवे, कुरुंद, पारनेर, काकणेवाडी, वनकुटे,धोत्रे, पिंपळगाव रोठा, धोत्रे, हकीकतपूर, निघोज, जवळा, पिंपरी जलसेन, कुरुंद, जातेगाव, सुपा, जामगाव, शहांजापूर, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, हिवरे कोरडा, नारायणगव्हाण, नांदुरपठार, सावरगाव, वासुंदे, गाडीलगाव, वाळवणे, वाडेगव्हाण, पठारवाडी, गुणोरे, वडझिरे, ढवळपुरी, काळकुप, वडुले, कर्जुले हर्या, पोखरी, पाडळी आळे, भांडगाव, वडगाव आमली, दैठणे गुंजाळ, वडनेर, मोरवाडी, कोहोकडी, यादववाडी, कडुस, वडनेर हवेली, विरोली, चिंचोली, रायतळे, वनकुटे, रेवाड़ी, बाभुळवाडी, धोत्रे खुर्द, ढोकी, सांगली सुर्या, म्हसे, हत्तलखिंडी, कारेगाव, लोणीहवेली, भोंद्रे, वारणवाडी, गाजदीपूर, खडकवाडी, पळशी, तास. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wMYrc0

No comments