ads

Breaking News

इंधन दर ;जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे आहेत. दरम्यान, आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आत विरोधकांकडून इंधन दरवाढ आणि महागाईचा भडका या मुद्द्यावर सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. मुंबईत आजचा ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा भाव ७७ डॉलरवर गेला होता. मात्र पुन्हा तो ७३ डॉलरपर्यंत खाली आहे. कच्च्या तेलाचा भाव ७० डॉलरवर असल्याने कंपन्यांसाठी मात्र इंधन आयात खर्चिक बनली आहे. डॉलरसमोर रुप्याचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील दरवाढ यामुळे कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. आज जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ७२.७१ डॉलर प्रती बॅरल आहे. त्यात ०.८८ डॉलरची घसरण झाली आहे. यूएस वेस्ट टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.७५ डॉलरने कमी होऊन ७१.०६ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. मे महिन्यात पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला होता. आतापर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी ४२ वेळा पेट्रोल दरवाढ केली आहे. ज्यात पेट्रोल ११.५२ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलमध्ये देखील याच कालावधीत जवळपास १० रुपयांची वाढ झाली आहे.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3hNOO8G

No comments