ads

Breaking News

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन; वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास

रायगडः काँग्रेसचे माजी आमदार () यांचं आज निधन झालं आहे. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. सकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे. मधुकर ठाकूर हे मागील ३ ते ४ वर्षांपासून आजारी होते. अलिबाग उरण मतदारसंघाचे ते माजी आमदार होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व नंतर आमदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द आहे. २००४ ते २००९ या कालावधीत ते अलिबाग- उरण मतदारसंघाचे आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. आज दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर आलिबाग तालुक्यातील सातीर्जे या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. वाचाः नाना पटोलेंचं ट्वीट अलिबाग उरण मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज दु:खद निधन झाले. झिरास ग्रामपंचायतीचे सरपंच ते आमदार अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी ठाकूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Tbvhpj

No comments