ads

Breaking News

गुरुवारी देशात ३८,९४९ रुग्णांची भर तर ५४२ जणांचा मृ्त्यू

नवी दिल्ली : आज (शुक्रवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (१५ जुलै २०२१) ३८ हजार ९४९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी १० लाख २६ हजार ८२९ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ३० हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ५४२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख १२ हजार ५३१ वर पोहचलीय. गुरुवारी ४० हजार ०२६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ०१ लाख ४३ हजार ८७६ वर पोहचलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील रिकव्हरी दरात वाढ होऊन हा दर ९७.२८ टक्क्यांवर आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.३९ टक्के आहे. देशात आठवड्याचा सध्या २.१४ टक्के आहे तर दैनिक पॉझिटिव्हिटी रेट १.९९ टक्क्यांवर आहे. सलग २५ व्या दिवशी दैनिक पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली असल्याचं दिसून येतंय. तसंच देशानं करोना चाचणीचा ४४ कोटींचा टप्पा पार केलाय.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी १० लाख २६ हजार ८२९
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी ०१ लाख ४३ हजार ८७६
  • उपचार सुरू : ४ लाख ३० हजार ४२२
  • : ४ लाख १२ हजार ५३१
  • करोना लसीचे डोस दिले गेले : ३९ कोटी ५३ लाख ४३ हजार ७६७
लसीकरण मोहीम देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ३९ कोटी ५३ लाख ४३ हजार ७६७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३८ लाख ७८ हजार ०७८ लसीचे डोस गुरुवारी एका दिवसात देण्यात आले. भारतात पार पडलेल्या चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं ()दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२१ पर्यंत देशात एकूण ४४ कोटी ०० लाख २३ हजार २३९ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १९ लाख ५५ हजार ९१० नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3emLDTi

No comments