ads

Breaking News

Mumbai Rain Live Update: मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका; मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं रायगड, तळकोकणाला झोडपून काढल्यानंतर मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई व उपनगरात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतितीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Mumbai Rain Alert) मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग शहरात येत्या तीन तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्गातही काहीशा विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात केली आहे. Live Update
  • मुसळधार पावसामुळं मुंबईत धावणाऱ्या बेस्ट बसचे मार्ग वळवले
  • सायन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साचले; लोकल वाहतूकीला फटका
  • कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले; मध्ये व हार्बर रेल्वेची वाहतूक २०- २५ मिनिटे उशीरा
  • मुसळधार पावसाचा वाहतूकीला फटका; मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक मंदावली
  • मुसळधार पावसामुळं वडाळा परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
  • मुंबईः चुनाभट्टी स्थानकात रेल्वे रूळांवर पाणी साचण्यास सुरुवात
  • सिंधुदुर्गः तिलारी धरण क्षेत्रातील कॉजवे पाण्याखाली; पाच गावाचा संपर्क तुटला, पुरस्थीती कायम
  • ठाणे, रायगड, रत्नागिरीतही पावसाची संततधार सुरूच
  • मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3remZcL

No comments