करोनाविरुद्ध देशात ४० लाख बाहुबली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवनात उपस्थित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना परिस्थितीवर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार उत्सुक असल्याचं सांगितलं. जेव्हा तुम्ही 'बाहू'वर लसीचा डोस घेता तेव्हा तुम्ही 'बाहुबली' होता. आतापर्यंत ४० कोटींहून अधिक लोक करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ४० कोटी ६४ लाख ८१ हजार ४९३ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १३ लाख ६३ हजार १२३ लसीचे डोस रविवारी एका दिवसात देण्यात आले. आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (१९जुलै २०२१) ३८ हजार १६४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ११ लाख ४४ हजार २२९ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख २१ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा दैनिक पॉझिटिव्हिटी दर २.६१ टक्के आहे. सलग २८ व्या दिवशी दैनिक ३ टक्क्यांच्या खाली असल्याचं दिसून येतंय. तर देशाच्या रिकव्हरी दरात वाढ होऊन हा दर ९७.३२ टक्क्यांवर पोहचलाय. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ४९९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख १४ हजार १०८ वर पोहचलीय. रविवारी ३८ हजार ६६० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ०३ लाख ०८ हजार ४५६ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ११ लाख ४४ हजार २२९
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी ०३ लाख ०८ हजार ४५६
- उपचार सुरू : ४ लाख २१ हजार ६६५
- : ४ लाख १४ हजार १०८
- करोना लसीचे डोस दिले गेले : ४० कोटी ६४ लाख ८१ हजार ४९३
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hUajVL
No comments