ads

Breaking News

'मुंबईकरांची वाट लावूनही महापालिका पहिली कशी हा प्रश्न लोकांना पडेल, पण...'

मुंबईः देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडीतही आनंद व्यक्त होत आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावरुन सरकारचा व मुंबई महानगरपालिकेला टोला हाणला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. तर, पावसामुळं ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून मुंबईत विविध ठिकाणी अनेक लोक मरण पावले आहेत. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महापालिका व शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. वाचाः संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. जसा बेस्ट शी.एमचा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल. मुंबईकरांची इतकी वाट लावून महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण सामनामध्ये हेडलाइन येईल 'आमचीच लाल आमचीच लाल', असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3exgE7i

No comments