ads

Breaking News

करोना: मुंबईत आज ४४६ नव्या रुग्णांचे निदान; पाहा, मुंबई-ठाण्याची ताजी स्थिती!

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली असून मुत्यूंची संख्याही तुलनेने कमी झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ४४६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५४५ इतकी होती. तर, दिवसभरात ४७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. काल ही संख्या ५०५ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १३ इतकी होती. ( mumbai registered 446 new cases in a day with 470 patients recovered and 11 deaths today) याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ५ हजार २३४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ६७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ९५१ दिवसांवर जाऊन पोहचला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत आज ३५ हजार ३६२ चाचण्या मुंबईत आज एकूण ३५ हजार ३६२ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ७ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ७० इमारती सील करण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती २४ तासांत बाधित रुग्ण - ४४६ २४ तासात बरे झालेले रुग्ण - ४७० बरे झालेले एकूण रुग्ण - ७०५२३४ बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९६% एकूण सक्रिय रुग्ण- ६९७३ रुग्ण दुपटीचा कालावधी- ९५१ दिवस कोविड वाढीचा दर (०९ जून ते १५ जुलै)- ०.०७ % क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात ४८१ रुग्णांची वाढ ठाणे : जिल्ह्यात रुग्णांची वाढ कायम असून शुक्रवारी नवीन ४८१ रुग्ण आढळले. यापैकी ठाणे ९६, कल्याण-डोंबिवली ८७, नवी मुंबई १४०, उल्हासनगर १३, भिवंडी ४, मिरा-भाईंदर ५२, अंबरनाथ ८, बदलापूर २९, ठाणे ग्रामीणमध्ये ५२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधीतांची संख्या वाढत ५ लाख ३९ हजार ८७६ इतकी झाली आहे. तर दिवसभरात १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने करोनाबळींची संख्या वाढत १० हजार ८९२ वर गेली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xKvY8g

No comments