ads

Breaking News

darekar criticizes aghadi govt: 'जे मंदिरांना टाळे लावतात, ते वारकऱ्यांची काय काळजी घेणार?'; प्रवीण दरेकरांचा आघाडी सरकारवर निशाणा

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी आषाढी एकादशीच्या यात्रेवर कडक निर्बंध लावल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. वारकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकार हे कान असूनही बहिरेपणाची भूमिका घेत असल्याचे सांगत दरेकर यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. (opposition leader criticizes mahavikas aghadi govt) दरेकर अकलूजमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. सरकारवर टीकास्त्र सोडताना दरेकर म्हणाले की, वारकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा भूमिका मांडली. परंतु हे सरकार कान असून बहिऱ्यासारखे करत आहे. किंबहुना या सरकारच्या संवेदनाच गोठल्या आहेत. हे संवेदनशील सरकार असते तर आमची मंदिरे, देवदेवता टाळ्यात आणि कुलुपांत राहिली नसती. यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म सर्वकाही बासणात गुंडाळले आहे. जे मंदिरांना टाळे लावू शकतात, त्यांना वारकऱ्यांची किती काळजी असणार?, आम्ही सर्व नियम पाळू असे सांगत होते, मात्र सरकारचे धोरण मात्र आम्हाला हवे तसेच आम्ही वागू, असेच सरकारचे वागणे आहे. क्लिक करा आणि वाचा- 'हे म्हणजे नानांच्या नाना तऱ्हा' या वेळी दरकेर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. नानांच्या नाना तऱ्हा असतात. नाना सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरेच बोलतात आणि संध्याकाळी विड्रॉ होतात. यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे याचा विचार आपण केला पाहिजे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापूर अकलूज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. क्लिक करा आणि वाचा- विरोधी पक्षनेते दरेकर आज सोलापूर अकलूज येथे दौऱ्यावर आहेत. पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नावर दरेकर बोलत होते. नाना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांचे म्हणणे काहीसे गांभीर्याने घ्यावे लागेल. त्यांच्या पक्षातच त्यांच्या वक्तव्यावर टीका होते. परंतु त्यांनी सांगितलेली भूमिका हे वास्तव आपल्या सगळ्याना मान्य करावे लागेल. २०१४ ला राष्ट्रवादीने त्यांच्याबरोबर युती केली नाही. मग आयत्या वेळेला राष्ट्रवादी त्याना धोका देऊ शकते. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल घेतलेली भूमिका योग्यच आहे, न्याय्यच आहे, असे दरेकर यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z5aD9w

No comments