लसीचे दोन्ही डोस मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी पुरेसे : ICMR
नवी दिल्ली : भारतात करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जातोय. अशावेळी शुक्रवारी नीती आयोगाचे सदस्य डॉ. यांनी आयसीएमआरच्या एका अभ्यासाचा हवाला देत करोना मृत्यू टाळण्यासाठी पुरेसे असल्याचं सांगितलंय. करोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान लसीचे दोन्ही डोसमुळे सर्वोच्च धोका असणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांत ९५ टक्के कोविड १९ मृत्यू रोखले, असं डॉ. पॉल यांनी म्हटलंय. आयसीएमआरचा अभ्यास देशात करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरियंट जबाबदार मानला जातोय. आयसीएमआरच्या एका अभ्यासात तामिळनाडूत १,१७,५२४ पोलीस कर्मचाऱ्यांत करोना लसीची प्रभावशीलतेचं आकलन करण्यात आलं. यातील ६७,६७३ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन डोस तर ३२,७९२ पोलिसांना एक डोस देण्यात आला होता. तर जवळपास १७,०५९ पोलीस कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं नव्हतं. डॉ. पॉल यांच्या म्हणण्यानुसार, करोना लस न घेणाऱ्या १७,०५९ पोलीस कर्मचाऱ्यांपैंकी २० जणांचा मृत्यू कोविड १९ मुळे झाला. तर कमीत कमी एक डोस घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांत केवळ ७ मृत्यू नोंदविण्यात आले. याच वेळी लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या ६७,६७३ पोलीस कर्मचाऱ्यांपैंकी केवळ ४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे, लस न घेणाऱ्या प्रती १००० पोलिसांत मृत्यू दर १.१७ टक्के तर लसीचा एक डोस घेणाऱ्यांत मृत्यू दर ०.२१ आणि लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांत मृत्यू दर ०.०६ टक्के नोंदविण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, देशभरात एकूण ३९ कोटी ९६ लाख ९५ हजार ८७९ लसीच्या डोसचा वापर करण्यात आला आहे. यातील ४२ लाख १२ हजार ५५७ लसीचे डोस शुक्रवारी देण्यात आले.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VMqHyF
No comments