ads

Breaking News

पेट्रोल महागले ; पेट्रोलियम कंपन्यांची इंधन दरवाढ सुरूच

मुंबई : एक दिवस विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा कंपन्यांनी इंधन दरवाढ केली आहे. आज शनिवारी कंपन्यांनी पेट्रोलचा भाव ३० पैशांनी वाढवला आहे. दुसऱ्या बाजूला डिझेल दर जैसे थेच ठेवण्यात आला आहे. आज शनिवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. आज मुंबईत ९७.४५ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये झाले आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ७१.९३ डॉलर प्रती बॅरल झाला. त्यात ०.३९ टक्के वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७३.६९ डॉलर प्रती बॅरल झाला.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3Be8b2n

No comments