LIVE संसद अधिवेशन : सकाळी ११.०० वाजता होणार अधिवेशनाला सुरुवात
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय. विरोधकांकडून शेतकऱ्यांचे प्रश्न, लसीकरण धोरण आणि महागाईच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी करण्यात आलीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सदनात शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे LIVE अधिवेशन :
- संसदेच्या दोन्ही सभागृहांत सकाळी ११.०० वाजता कामकाजाला सुरुवात
- आमची प्रयत्न आहे की करोना संक्रमणाच्या विषयावर प्राधान्याने चर्चा व्हावी आणि आम्हाला सर्व खासदारांकडून विधायक सूचना मिळाव्यात, जेणेकरून कोविडविरूद्ध लढा देण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल आणि उणीवा दूर होऊन प्रत्येक जण एकत्रित वाटचाल करतील. मी सर्व खासदारांना आणि सर्व पक्षांना सभागृहात अत्यंत कठीण आणि तीव्र प्रश्न उपस्थित करण्यासाठी उद्युक्त करू इच्छितो. परंतु त्याचसोबत उत्तर देण्यासाठी शासनाला शिस्तबद्ध वातावरणात वेळ द्यावा. यामुळे लोकशाहीला चालना मिळेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही बळकट होईल, असं वक्तव्य संसद भवनात उपस्थित झाल्यानंतर पंतप्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय.
- मी आशा करतो की तुम्हा सर्वांना लसीचा कमीत कमी एक डोस मिळाला असेल. जेव्हा तुम्ही 'बाहू'वर लसीचा डोस घेता तेव्हा तुम्ही 'बाहुबली' होता. आतापर्यंत ४० कोटींहून अधिक लोक करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- लोकसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीची बैठक आज दुपारी २.०० वाजता तर राज्यसभा व्यवसाय सल्लागार समितीची बैठक सायंकाळी ४.०० वाजता पार पडेल
- केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत आज फॅक्टरिंग रेग्युलेशन (दुरुस्ती) विधेयक, २००० सादर करणार आहेत.
- संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आपल्या नियमित वेळेत अर्थात ११.०० वाजता सुरू होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सदनांत खासदारांसाठी पब्लिक गॅलरीमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आलीय.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०.०० वाजता संसद भवनात उपस्थित होणार आहेत.
- संसद अधिवेशनात एकूण ३१ विधेयकांवर संसद सभागृहांत चर्चा होण्याची शक्यता आहे. यातील सहा विधेयकं अशी आहेत जी अध्यादेशांच्या ऐवजी मांडली जाणार आहेत.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zaJ4Mb
No comments