'करोना हा यापुढे महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून ओळखला जाईल'
मुंबईः राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी सण- समारंभामुळं करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध कठोर करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. यावरुन मनसेनं पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. () मनसेचे नेते यांनी एक ट्वीट करत ठाकरे सरकार जोरदार टीका केली आहे. तसंच, करोना डेटाबाबत सरकारकडे एक मागणी केली आहे. संदीप देशपांडे यांच्या ट्वीटची सध्या जोरात चर्चा आहे. 'महाराष्ट्रात करोनाचं एवढं स्तोम माजवलं जातंय की, यापुढे करोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. सरकारने करोना संबधित सर्व डेटा जनतेबरोबर पारदर्शकपणे शेअर केला पाहिजे,' असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा करोना संसर्गामध्ये थोडीशी वाढ दिसू लागली असून ती राज्यातील परिस्थिती बिघडवू शकते, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला. 'प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. केरळ राज्यात दररोज ३० हजार नवे बाधित होत आहेत. हा धोक्याचा इशारा असून तो गांभीर्याने घ्यायला हवा. अन्यथा, राज्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. सण, उत्सव आले आहेत. त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DT3lZL
No comments