ads

Breaking News

तोडफोड, जाळपोळ... त्रिपुरात भाजप कार्यकर्त्यांची विद्यार्थी संघटनेसोबत हाणामारी

गोमती : त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यात आणि डाव्यांशी निगडीत विद्यार्थी संघटना '' () या दोन गटांत हिंसक झडप झाली. हिंसाचारात जाळपोळ आणि तोडफोडीच्याही घटना घडल्या आहेत. स्थानिक मीडियानं दिलेल्या मिळालेल्या, ' (मार्क्सवादी)' () शी निगडीत विद्यार्थी संघटनेकडून एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादानं काही वेळातच हिंसेचं स्वरुप धारण केलं. त्रिपुराच्या गोमती जिल्ह्याच्या उदयपूर शहरात ही घटना घडली. कथितरित्या विद्यार्थी संघटनेच्या रॅलीदरम्यान सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. या झटापटीत भाजपचा एक कार्यकर्ता गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला आगरतळाच्या एका रुग्णालयात हलवण्यात आलंय. तर विद्यार्थी संघटनेचे दोन-तीन जखमी आहेत. हिंसाचारानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंसाचारानंतर सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनी या घटनेचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे कृषी मंत्री प्रणजीत सिंह रॉय यांनी घटनास्थळी पोहचून या घटनेचा आढावा घेतला. यावेळी, माकपाच्या विद्यार्थी संघटनेनं पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय भाजप सरकार हिंसेत सहभागी असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास करत असल्याचं म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर हिंसाचारानंतर आगरतळा, विशालगड आणि कथलिया इथळ्या माकपा पक्षाच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. तसंच कार्यालयांत आगही लावण्यात आली. तसंच माजी मंत्री रतन भौमिक यांच्या एका वाहनाला पेटवन देण्यात आलं. सोमवारीही दोन गटांत झडप या अगोदर सोमवारीदेखील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांदरम्यान हिंसाचार घडला होता. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांना कथितरित्या धनपूर जाण्यापासून रोखल्यानंतर हा हिंसाचार उफाळला होता.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38Uhh7A

No comments