ads

Breaking News

यंदा अयोध्येतील दीपोत्सवासोबत साजरी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी!

नवी दिल्ली : यंदा अयोध्येत आपली दिवाळी साजरी करण्याची शक्यता आहे. 'रामनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत दिवाळी निमित्तानं साजरा केला जातो. यंदाच्या दीपोत्सवाला खुद्द पंतप्रधान मोदी हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात येतंय. ( Participate in ) उत्तर प्रदेशात आगामी वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. अयोध्येतील पाचवा दीपोत्सव २०१७ साली मार्च महिन्यात उत्तर प्रदेशात भाजप सरकारनं दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरू वात केली होती. अयोध्येत यंदा पाचवा दीपोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या दीपोत्सवात ७५०० स्वयंसेवकांच्या मदतीनं ७ लाख ५० हजार दीप प्रज्वलित केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्यात आणखीही काही कार्यक्रमांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा अयोध्येतील दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री , अनेक केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेश सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित असतील. त्यामुळे यंदा उत्तर प्रदेशातील दीपोत्सवाचा कार्यक्रम दणक्यात होणार हे स्पष्टच दिसतंय. २ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्येला पोहचण्याची तारीख आणि इतर माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी यंदा ४ नोव्हेंबर रोजी आहे. अयोध्येत दीपोत्सवाचा कार्यक्रम धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला सुरू होईल. त्यामुळे, २ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान अयोध्येत असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. रणसंग्रामाचा केंद्रबिंदू गेल्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या निर्माणासाठी भूमिपूजन पार पडलं होतं. अयोध्येसंबंधी कामाचा राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी नेते मंडळींकडून वेळोवेळी आढावाही घेतला जातो. दुसरीकडे, बसपाकडूनही अयोध्येत प्रबुद्ध संमेलन सुरू केलंय तर असदुद्दीन ओवैसी यांचाही अयोध्या दौरा नुकताच पार पडलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा अयोध्येची भूमी रणसंग्रामाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VrPXKR

No comments