ads

Breaking News

काळीज सुन्न करणारी घटना; 'त्या' तरुणाला विवस्त्र करून मारले आणि...

म. टा. प्रतिनिधी, प्रेमप्रकरणातून एका कॉलेज युवकाचा खून करण्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यात घडला. मारहाण करत असलेल्यांच्या तावडीतून ग्रामस्थांनी सोडविल्यानंतरही त्याला पुन्हा दुसरीकडे नेऊन विवस्त्र करत झालेल्या मारहाणीमुळे या तरूणाचा अंत झाला. या प्रकरणातील संशयित आरोपी फरारी असून त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्यामुळे सातवे या गावात वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (the in a love affair in panhala of kolhapur) पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील मोन्या उर्फ शिवतेज विनायक घाटगे या अठरा वर्षाच्या तरूणाचे गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. तो बारावीच्या वर्गात शिकत होता. गावातील निवडणूक प्रचारात त्या दोघांची ओळख होवून त्याचे प्रेमात रूपांतर झाले होते. त्यातून ते दोघे पळूनही गेले होते. पण नंतर काही ग्रामस्थांनी समझोता करून मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तेव्हापासून गेले चार महिने या प्रकरणातून या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता. क्लिक करा आणि वाचा- याच वादातून शिवतेज यास मांगले येथील एका शेतात गाठून त्याला जबर मारहाण करण्यात आली. तत्पूर्वी गावात त्याला मारहाण सुरू असताना ग्रामस्थांनी सोडवले. नंतर त्याला शेतात नेऊन तेथे विवस्त्र करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथेच त्याचा मृत्यू झाला. क्लिक करा आणि वाचा- शिवतेजचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या नातेवाईकांनी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात गोंधळ घातला. आरोपींना अटक करा, जोपर्यंत त्यांना अटक करत नाही, तोपर्यंत शिवतेजचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे मात्र सातवे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले . तेथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात भाऊसाहेब दळवी, सौरभ दळवी, पतंग दळवी, अजय दळवी, संजय दळवी, धनाजी दळवी, सोहम दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3njF1e2

No comments