भाजप खासदाराच्या सुनेला मारहाण?; राष्ट्रवादीकडे मदत मागत केला गंभीर आरोप
मुंबईः वर्ध्याचे भाजपचे खासदार () यांच्या सुनेनं गंभीर आरोप केला आहे. कुटुंबाकडून मारहाण व अत्याचार होत असल्याचा आरोप केल्यानं खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष () यांनी ट्वीट करत हा दावा केला आहे. तसंच, रामदास तडस यांच्या सुनेनं चाकणकर यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे. रामदास तडस यांच्या सुनेनं एक व्हिडिओ बनवला आहे. तोच व्हिडिओ रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केला आहे. त्यात भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओत त्या म्हणतायेत, मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला, मी विनंती करते. या व्हिडिओमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. वाचाः वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून यांना गेली अनेक दिवस तडस कुटुंब मारहाण करुन अत्याचार करत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला. तातडीने पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदधिकारी व पोलिस संरक्षणासाठी पोहोचले आहेत, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X4oU9h
No comments