ads

Breaking News

देशात पहिल्यांदाच... खासगी कंपनी सैन्यासाठी उभारणार एअरक्राफ्ट!

नवी दिल्ली : संरक्षण विषयक मंत्रिमंडळाच्या समितीनं (CCS) नवे खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील दिलाय. हे '' आणि '' मिळून भारतातच तयार करणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, देशात पहिल्यांदाच सैन्याशी निगडीत एअरक्राफ्ट बनवण्याचं कंत्राट एखादी खासगी कंपनीला देण्यात आलंय. यामुळे '' धोरणालाही प्रोत्साहन मिळू शकेल. या कंत्राटामुळे येणाऱ्या काही वर्षांत ६००० हून अधिक रोजगार निर्माण होतील. सोबतच देशात एव्हिएशनचं अत्याधुनिक तंत्रज्ञानही दाखल होईल. १५ हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचं हे कंत्राट असल्याचं समजतंय. देशात २०१२ पासून ५६ सी २९५ मीडियम वेट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनवण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. परंतु, यंदाच फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण (CCS) कडे दाखल झालं होतं. १६ विमान एअरबस डिफेन्स (स्पेन) हून आयात केले जातील तर इतर विमानं येत्या १० वर्षांत 'टाटा'च्या जागेत उभारले जातील. कोस्ट गार्ड तसंच इतर संरक्षण एजन्सीसाठीही याच पद्धतीच्या विमानांची आणखी मागणी केली जाण्याचीही शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात तयार करण्यात आलेल्या सी २९५ मीडियम वेट विमानं इतर देशांना निर्यातही केली जाऊ शकतात. त्यामुळे हा एक महत्त्वाचा आणि फायदेशीर प्रकल्प ठरू शकतो. संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सैन्याशी निगडीत विमानं बनवण्याची जबाबदारी केवळ सरकारी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडे सोपवली जात होती. परंतु, पहिल्यांदाच देशातील एखादी खासगी कंपनी सैन्यासाठी एअरक्राफ्ट उभारणार आहे. यानुसार, तयार करण्यात आलेल्या सर्व ५६ विमानांवर स्वदेश 'इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट' सिस्टम लावण्यता येईल. ही विमानं कालबाह्य ठरत असलेल्या 'एवरो' (Avro) विमानांची जागा घेतील. या 'मेक इन इंडिया' प्रोजेक्ट अंतर्गत अल्युमिनिअम ब्लॉक्स आयात केले जातील. त्यानंतर विमानं उभारून ते देशात वापरात आणले जातील. ही विमानं देशाबाहेर निर्यातही करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tsGKib

No comments