ads

Breaking News

संघाची तालिबानशी तुलना : 'जावेद अख्तर यांना अफगाणिस्तानात पाठवा'

शाहजहांपूर, उत्तर प्रदेश : ज्येष्ठ गीतकार आणि विचारवंत जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारांची तुलना तालिबानशी केल्यानंतर एक नवा वाद उभा राहिलाय. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये याविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अख्तर यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी नाराज कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर जावेद अख्तर यांचा पुतळा जाळला आणि जोरदारा घोषणाबाजी केली. यावेळी, 'आरएसएसची तुलना तालिबानशी करणाऱ्या जावेद अख्तर यांना विमानानं अफगाणिस्तानात धाडलं पाहिजे' असं म्हणत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. जावेद अख्तर यांचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. त्यांनी एका कापडी पुतळ्यावर जावेद अख्तर यांचा फोटो चिपकावला आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विहिंप कार्यकर्त्यांनी रोडवरच वाहतूक थांबवून गोंधळही घातला. जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केलीय. हे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा लोकांना विमानात बसवून अफगाणिस्तानात धाडायला हवं. अशा लोकांना देशात राहण्याचा कोणताही हक्क नाही, असं म्हणतानाच जावेद अख्तर यांच्याविरोधात सरकारनं कारवाई केली नाही तर कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं या वक्तव्याशी निपटेल, अशी धमकीही विहिंप कार्यकर्त्यांनी दिलीय.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tmDc0w

No comments