ads

Breaking News

Coronavirus: करोनाबाधितांची दिवसाची संख्या ३१ हजारांवर तर २९० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशाला असलेला करोना संक्रमणाचा धोका अद्याप क्षमलेला नाही. देशात गेल्या २४ तासांत ३१ हजार २२२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २९० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ३० लाख ५८ हजार ८४३ वर पोहचलीय. तर देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार ०४२ वर पोहचलीय. जवळपास ४ लाख जणांवर उपचार सुरू आज (शुक्रवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी (६ सप्टेंबर २०२१) ४२ हजार ९४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. करोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी २२ लाख २४ हजार ९३७ वर पोहचलीय. तर देशात सध्या ३ लाख ९२ हजार ८६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण उल्लेखनीय म्हणजे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद होताना दिसून येतेय. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १९ हजार ६८८ रुग्ण आढळून आलेत. तर २८ हजार ५६१ रुग्णांनी करोनावर माक केलीय. राज्यात १३५ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर अजूनही १६.७१ टक्क्यांवर आहे.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ३० लाख ५८ हजार ८४३
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी २२ लाख २४ हजार ९३७
  • उपचार सुरू : ३ लाख ९२ हजार ८६४
  • एकूण मृत्यू : ४ लाख ४१ हजार ०४२
  • करोना लसीचे डोस दिले गेले : ६९ कोटी ९० लाख ६२ हजार ७७६
भारतात पार पडलेल्या चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात एकूण ५३ कोटी ३१ लाख ८९ हजार ३४८ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १५ लाख २६ हजार ०५६ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली. लसीकरण मोहीम देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ६९ कोटी ९० लाख ६२ हजार ७७६ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १३ लाख ५३ हजार ५७१ लसीचे डोस सोमवारी एका दिवसात देण्यात आले आहेत.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jP4lX9

No comments