ज्योतिरादित्य शिंदेंच्या हस्ते 'चिपी' विमानतळाचं उद्घाटन, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण नाही?
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या (९ ऑक्टोबर) रोजी होणार आहे, अशी माहिती खुद्द कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री यांनी दिलीय. मात्र, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री यांना आमंत्रित केलं जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'प्रत्येक कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असावेत हे गरजेचं नाही', असं म्हणत नारायण राणे यांनी ही शक्यताच फेटाळून लावलीय. 'नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ११.३० वाजता चिपी विमानतळाचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमात मी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित असणार आहोत', असं सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून अशाच पद्धतीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याद्वारे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर राणेंनी ही घोषणा केलीय. यामुळे, राणे आणि शिवसेनेत नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. '७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाला यासंबंधी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे', अशी घोषणा सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे शिवसेना खासदार यांनी केली होती. राऊत यांच्या या घोषणेबद्दल नारायण राणेंना प्रश्न केला असता 'राऊत यांनी ही घोषणा कोणत्या आधारावर केली तसंच त्यांनी घोषणा करण्यापूर्वी संबंधित मंत्र्यांशी याबद्दल चर्चा केली का?' असा प्रश्नही राणे यांनी विचारला होता. २०१४ साली महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना आपल्या प्रयत्नांमुळे चिपी विमानतळाचं काम पूर्ण झाल्याचा दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला. विमानतळाचं उद्घाटन केलं जात असेल तर त्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाशी समन्वय साधणं गरजेचं आहे, असे बोलही नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावले. ठाकरे सरकारवर निशाणा साधताना ३५ कोटी रुपये खर्चुन निर्माण करण्यात येत असलेला संपर्क मार्गाचं काम आत्तापर्यंत पूर्ण होऊ शकलेलं नाही, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DWxGH3
No comments