ads

Breaking News

भाविकांसाठी IRCTC कडून 'रामायण सर्किट ट्रेन' सुरू, कसा असेल प्रवास? जाणून घ्या...

नवी दिल्ली : ''कडून ७ नोव्हेंबर पासून रामायण सर्किट ट्रेनला सुरूवात करण्यात आलीय. या रेल्वेच्या माध्यमातून श्रीरामाशी निगडीत वेगवेगळ्या भाविकांना एकाच फेरीत घेता येणार आहे. आयआरसीटीसीनं दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरून ही रेल्वे रवाना होईल. त्यानंतर असा प्रवास ही रेल्वे करणार आहे. १७ दिवसांचा प्रवास ही रेल्वे १७ दिवसांत ७५०० किलोमीटरचं अंतर कापणार आहे. दिल्लीहून निघाल्यानंतर सर्वात अगोदर अयोध्येत दाखल होईल. इथे , श्री हनुमान मंदिर आणि भरत मंदिराचे दर्शन भाविकांना करता येईल. त्यानंतर ही रेल्वे सीतामढीकडे वाटचाल करेल. इथे जानकी जन्म स्थान आणि राम मंदिराचे दर्शन घेता येईल. इथून पुढे ही रेल्वे काशी, चित्रकूट आणि नाशिकहून प्रवास करत कर्नाटकातील हम्पीत दाखल होईल. या प्रवासाचा शेवट रामेश्वरम स्टेशनला होईल. इथून ही रेल्वे पुन्हा राजधानी दिल्लीकडे रवाना होईल. काय असेल तिकीट दर? या प्रवासासाठी एसी फर्स्ट क्लासचं भाडं १ लाख ०२ हजार ०९५ रुपये असेल तर सेकंड क्लासचं भाडं ८२ हजार ९५० रुपये आहे. तिकीट बुकींगसाठी प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर संपर्क साधू शकतील. सध्या कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वेकडून सुविधा १७ दिवसांच्या या प्रवासात प्रवाशांच्या राहण्यासहीत खाण्या-पिण्याची सगळी व्यवस्था आयआरसीटीसीकडून करण्यात येईल. सोबतच लक्झरी बसमधून धार्मिक स्थळांकडे प्रवाशांना नेलं जाईल. राहण्यासाठी एसी हॉटेलची व्यवस्था उपलब्ध असेल. तसंच लायब्ररी, किचन, शॉवर आणि टॉयलेट अशा सुविधाही उपलब्ध असतील.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DUrmzR

No comments