नवाब मलिक यांना अशीच पिढी घडवायची आहे; माजी खासदार भडकला
मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Cordelia Cruise Drug Case) अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला गुरुवारी अखेर जामीन मिळाला. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर आज त्याची सुटका होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते () यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण पूर्णपणे बोगस असून ते बॉलिवूडवाल्यांकडून खंडणी वसुलीसाठी रचण्यात आलेलं कुभांड आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी सुरुवातीपासूनच केला होता. हे सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत अनेक पुरावे सादर केले होते. आर्यन प्रकरणात भाजपशी संबंधित लोकांचा कसा संबंध आहे, हे देखील समोर आणण्याचा प्रयत्न मलिक यांनी केला. त्यामुळं खळबळ उडाली होती. जावयावर कारवाई झाल्यानं व शाहरुख खान मुस्लिम असल्यानंच मलिक हे वानखेडेंवर आरोप करत आहेत, असा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. त्यानंतरही मलिक यांनी पत्रकार परिषदा सुरूच ठेवत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं सुरूच ठेवलं होतं. वाचा: आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर मलिक यांनी 'पिक्चर तो अभी बाकी है' म्हणत लढाई सुरूच ठेवण्याचा इशाराही दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी खासदार () यांनी नवाब मलिक यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. मलिक यांच्यावर टीका करताना नीलेश राणे यांनी एकेरी भाषेचा वापर केला आहे. 'आर्यनला जामीन मिळाला, रात्री नवाब सुखानं झोपला असेल. आर्यन मोठं युद्ध जिंकून आला, की त्यानं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं? तरी तो सुटल्यानंतर काही मोजक्या तरुणांनी फटाके वाजवले, नवाब मलिकला अशीच पिढी घडवायची आहे,' असा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. 'हा माणूस महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे हे दुर्दैव आहे,' असंही नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CyMCtO
No comments