२६ दिवसांनंतर अखेर आर्यन खान कारागृहाबाहेर; 'मन्नत'वर रोषणाई
मुंबईः कोर्डिलिया क्रुझ प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. अखेर आज आर्यन खानची कारागृहातून सुटका झाली आहे. सकाळी ११च्या दरम्यान आर्यन जामिनावर कारागृहातून बाहेर आला आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर राज्यासह मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अमली पदार्थ प्रकरणात आर्यन २६ दिवसांपासून कारागृहात होता. गुरुवारी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळं शुक्रवारची रात्र आर्यनला तुरुंगात काढावी लागली होती. मात्र, आज शनिवारी आर्यनच्या जामीनाची प्रत आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत ठेवण्यात आलं होतं. शनिवारी पहाटे आर्थर रोड कारागृहातील अधिकाऱ्यांनी जामीन पेटी उघडली होती. त्यानंतर ९ वाजता आर्यनच्या जामीनावरील प्रक्रिया सुरू झाली होती. जवळपास १०. ३० च्या सुमारास आर्यनच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानुसार ११ वाजता आर्यनला सोडण्यात आलं. आर्यन खानला आणण्यासाठी अभिनेता शाहरुख खानही कारागृहाबाहेर पोहोचला होता. आर्यनची सुटका होताच शाहरुखचे अंगरक्षक तिथे दाखल होते. अंगरक्षकांसोबत आर्यन मन्नत बंगल्याकडे रवाना झाला आहे. मन्नतबाहेर जल्लोषाचे वातावरण दरम्यान, आर्यनच्या सुटकेनंतर शाहरुख खानचे निवासस्थान असलेल्या मन्नतबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे. शाहरुखचे अनेक चाहत्यांनी मन्नत बाहेर गर्दी केली आहे. तर, मन्नतला रोषणाई देखील करण्यात आली आहे. तसंच, शाहरुख व आर्यनचा मित्रपरिवारदेखील मन्नतवर उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nLqaYp
No comments