मनसेचा प्रतिडाव! शिवसेनेच्या खेळीला 'असं' देणार प्रत्युत्तर
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष () यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेनं आता पक्षाच्या विद्यार्थी शाखेची नव्यानं बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद () यांचे सुपुत्र यांच्याकडं दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. तसं झाल्यास भविष्यात तरुणाईला आकर्षित करण्यासाठी शिवसेना व मनसेमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ( to head student wing of ) शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा भरणा मोठा आहे. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांचं वत्कृत्व व आक्रमक बाण्याकडं आकर्षित होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील तरुण कार्यकर्त्यांनीही मनसेची वाट धरली होती. या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना केली होती. त्याचं अध्यक्षपद सुरुवातीपासूनच आदित्य शिरोडकर यांच्याकडं होतं. आता त्यांनी शिवबंधन हाती बांधल्यानं मनसेची विद्यार्थी सेना नेतृत्वहीन झाली आहे. विद्यार्थी सेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी व तरुणांना आकर्षित करण्यासाठी आता या विभागाचं नेतृत्व खुद्द अमित ठाकरे यांच्याकडं दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. वाचा: अमित ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून मनसेत सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडं सध्या मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी आहे. विद्यार्थी व तरुणांचे प्रश्न ते पक्षाच्या माध्यमातून मांडत असतात. करोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी डॉक्टर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडं सरकारचं पत्राद्वारे लक्ष वेधलं होतं. नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले अमित ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड कुतुहल आहे. अमित ठाकरे यांच्याकडं पक्षाची मोठी जबाबदारी असावी, असं मनसेच्या मोठ्या नेत्यांचं मत आहे. त्यातूनच त्यांच्यावर मनविसेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xSxDZy
No comments