'या व्यक्तीचे वानखेडेंशी नाते काय'?; एक फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा सवाल
मुंबईः कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात () राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) एनसीबीचे विभागीय संचालक (Sameer Wankhede) यांच्यावर दिवसागणिक नवनवे आरोप करत आहेत. वानखेडे हे ड्रग्ज प्रकरणात निरपराध लोकांना फसवण्यासाठी स्वत:च्या आर्मीचा वापर करतात असा गंभीर आरोप केल्यानंतर मलिक यांनी आता नवे ट्विट करत नवा चेहरा समोर आणला आहे. ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीचे दाऊद वानखेडे आणि समीर वानखेडे यांच्याशी काय नाते आहे, याबाबत कृपया माहिती द्यावी, असे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (In the case of and Drugs Party, Minister has brought a new face by tweeting) मंत्री नवाब मलिक गेले काही दिवस ज्या प्रमाणे एखादा मुद्दा उपस्थित करत नंतर त्यांचा खुलासा करत आहेत, त्यानुसार ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासाही ते लवकरच करतील अशी शक्यता आहे. नवाब मलिक या ट्विटमधील या व्यक्तीबाबत काय खुलासा करणार हे सांगणे कठीण असले तरी देखील त्या व्यक्तीचे समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी नाते आहे का?, असल्यास ते काय नाते आहे हे स्पष्ट झाल्यानंतरच मलिक यांना काय सांगायचे आहे हे स्पष्ट होणार आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- मलिकांनी वानखेडेंवर केला गंभीर आरोप अमली पदार्थविरोधी कारवाई करताना समीर वानखेडे यांनी आतापर्यंत शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सोबत न घेता त्यांनी प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. हे मी भविष्यात सिध्द करून दाखवेन असेही मलिक यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- एका रेस्टॉरंटमधून क्रूझवर गेले ड्रग्ज- मलिक मुंबईतील क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून आलेल्या जेवणासोबतच ड्रग्ज नेले गेले होते आणि याचे सगळे पुरावे माझ्याकडे असून मी ते उघड करणार आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही, तर आपल्याकडे असलेले सर्व पुरावे आपण एनसीबीच्या महासंचालकांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CzzYL5
No comments