ads

Breaking News

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्यापासून शहरात संचारबंदी लागू, काय आहेत नियम?

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आव्हान सरकारकडून करण्यात आलं आहे. पण या गणेशोत्सवाच्या काळात करोनाचा धोका वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नियम कठोर करण्यात आले असून पुण्यातही उद्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अधिक माहितीनुसार, पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत कलम १४४ लागू असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात करोनाचं संकट टाळण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी दक्षता म्हणून तब्बल सात हजार पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यात गणेशोत्सव हा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून या वेळी कठोर नियमावली आखण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना या सगळ्याचा पालन करत यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, लोक बाहेर पडणार नाहीत आणि बाजारपेठेतही नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी पोलिसांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर नागरिकांनी ही स्वतः शिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिस आयुक्तांकडून करण्यात आलेला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, आगमनाला विसर्जन, मिरवणुका आल्या पण यंदाच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर हे असं काही होणार नाही. या सगळ्यावर याहीवर्षी बंदी घालण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nfyLnf

No comments